भिगवण मध्ये सोनाज पेट्रोल पंपावरील दरोड्याचा प्रयत्न फसला भिगवण पोलिसांचे सतर्कतेमूळे

भिगवण :भिगवण शहरातील सोनाज पेट्रोल पंपावर पडणारा होता दरोडा पण भिगवण पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या सतर्कतेमुळे तो वेळीच उधळून लावण्यात पोलिसांना यश आले असून या प्रकरणी भिगवण पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. इ घटना रविवारी दि.२१ च्या मध्यरात्री घडली आहे

संदिप आनंद हीरगुडे (वय ३४ वर्षे रा.हारनस, ता. भोर, जि. पुणे),अनिकेत विलास सुकाळे (वय २३ वर्षे, रा. मुळ रा. काबरे ता. भोर जि.पुणे सध्या रा. मारूती मंदिराजवळ, रायकरमळा धायरी, पुणे) आणि रामदास उर्फ युवराज ज्ञानोबा शेलार ( वय.३३ वर्षे रा. वाकंम्बे ता. भोर, जि. पुणे सध्या रामारूती मंदिराजवळ, रायकरमळा धायरी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नांवे आहेत. सदर प्रकरणी भा.द.वि. कलम ३९९,४०२ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत भिगवण पोलिसांनी दिलेली माहिती अशी कीं, मौजे भिगवण ता.इंदापुर गावचे हददीत सागर हॉटेल जवळ असलेल्या सोनाज एच पी पेट्रोलपंपावर ४ ते ५ दरोडेखोर हे सशस्त्र दरोडा घालणार आहेत.अशी गोपनीय माहिती भिगवण पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती.त्यानुसार पवार यांनी भिगवण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने सापळा रचुन दरोडेखोरांचा डाव उढळून लावत तिघांना ताब्यात घेतले.त्याचेकडे विचारपुस केली असता आम्ही व आमचे साथीदार शंभुराज मच्छिंद्र जेधे, रा. आंबवडे ता. भोर जि.पुणे, पुनित (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही) मिळून सदर पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी आले असल्याची कबुली दिली

सदर आरोपींकडुन भिगवण पोलिसांनी एक गावठी पिस्टल, पाच जिवंत काडतुस, एक लोखंडी कटावणी, एक चाकु, एक रस्सी, मिरचीची पुड व एक होंडा कंपनीची ड्रिम युगा मोटार सायकल (नंबर एम.एच.१२ / के.एक्स.६४१९ ) असा एकुण १ लाख ५ हजार २००/- रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण डॉ अभिनव देशमुख,अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग मिलींद मोहीते, उपविभागीय पोलीस अधीकारी बारामती गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस-पाटील, रूपेश कदम, पोलीस अंमलदार इन्कलाब पठाण, समीर करे, आप्पा भंडलकर, रामदास जाधव, सचिन पवार, अंकुश माने, शंकर निंबाळकर, सुभाष गडदे, पोलीस मित्र रवी काळे, विकास गुनवरे, अशोक चोळके यांनी केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.