तृतीयपंथ्याच्या खून प्रकरणातील आरोपी 8 तासात जेरबंद ; यवत पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

पुणे :  पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात बोरीभडक येथे एका तृतीयपंथीयाचा खुनाचा गुन्हा ८ तासात उघडकीस आणण्यात यवत पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

मगरध्वज मारुती बंडेवाड उर्फ बंटी (वय-26 रा. कोळवाडी ता. अहमदपूर जि. लातूर सध्या रा. थेऊर, ता. हवेली) असे खून झालेल्या तृतीयपंथीचे नाव आहे. तर काजल उर्फ केशव उमाजी चव्हाण (वय-26 रा. रुई धानोरा, ता. गेवराई जि. बीड सध्या रा. थेऊर) असे अटक करण्यात आलेल्या तृतीयपंथीचे नाव आहे. याप्रकरणी मयत बंटीचा मोठा भाऊ पांडुरंग मारुती बंडेवाड (वय-28 रा. टिळेकर नगर, कात्रज) याने यवत पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21नोव्हेंबर रोजी सकाळी ९:३० वाजण्यापूर्वी बोरीभडक (ता.दौंड जि. पुणे) येथील वन विभागाचे जमिनीत त्यांचा तृतीयपंथी मगरध्वज मारुती बंडेवाड उर्फ बंटी याचा कोणीतरी खून केला असू त्याच्या डोक्यातुन व तोंडातून रक्तस्त्राव होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

खुनाची माहिती मिळताच यवत पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेने सदर खुनाचे गुन्ह्याचे ठिकाणी भेट देऊन संयुक्त तपास सुरू करून माहिती संकलित करून थेऊर फाटा ते सहजपुर फाटा पर्यंतचे CCTV फुटेज चेक केले. सदर CCTV फुटेज मध्ये मयत मगरध्वज बंडेवाड याचे सोबत आणखीन एक जण असलेचे दिसत होते. यवत पोलीस स्टेशन टीम व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मयतासोबत त्याचा सहकारी काजल चव्हाण असल्याची माहिती काढून त्यास थेऊर येथून चौकशी कामी ताब्यात घेऊन चौकशी केली असता काजल चव्हाण हा सुरवातीला उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला परंतु परंतु सखोल चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली.हा गुन्हा फक्त आठ तासातच उघडकीस आनल्याने यवत पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे कौतुक होत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागाय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके , पोलीस निरीक्षक नारायण पवार , सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, स्वप्नील लोखंडे, सचिन काळे, संदीप येळे,पोलीस हवालदार सचिन घाडगे,निलेश कदम, गुरूनाथ गायकवाड, गणेश करचे, राजीव शिंदे, संदीप देवकर, महेंद्र चांदणे,रामदास जगताप, मेघराज जगताप, निखिल रणदिव, सोमनाथ सुपेकर,मारुती बाराते, किरण तुपे यांनी केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.