दगडाने ठेचून तृतीयपंथीयाचा खून ; पुण्यातील दरी पुलाजवळील घटना

पुणे :कात्रज नव्या बोगद्याजवळील दरी पुलाच्या जंगलात एका तृतीयपंथीयाचा दगडाने डोक ठेचून खून करण्यात आला आहे. ही घटना सकाळी उघडकीस आल्यावर भारती विद्यापीठ पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली . मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. हा प्रकार आज (मंगळवार) सकाळी दरीपूलाजवळील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या शेजारील रस्त्यावर उघडकीस आला आहे.

सागर उर्फ सारिका उजागरे (वय-25 रा. म्हाडा कॉलनी, हडपसर) असे खून झालेल्या तृतीयपंथीचे नाव आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पुणे-सोलापूर महामार्गावर एका तृतीयपंथीचा मृतदेह आढळून आला आहे. आठवड्याभरात दोन तृतीयपंथीचा खून झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी परिसरातील नागरिक मॉर्निंग वॉक करण्यासाठी जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळून आला. नागरिकांनी घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी डोक्‍यात दगड घालून त्याचा खून करण्यात आल्याचे दिसून आले. तपासणी करत असताना तो तृतीयपंथी असल्याचे दिसून आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.