बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक ; 2 पिस्टल आणि 3 जिवंत काडतुसे जप्त
पुणे : बेकायदेशीर रित्या पिस्टल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या सिंहगड रोड पोलिसांनी ही कारवाई वडगाव बु येथील फन टाईम थिएटरच्या मागील कॅनॉल रोडवर केली. त्यांच्याकडुन पोलिसांनी 2 पिस्टल आणि 3 जिवंत काडतुसे असा एकूण 70 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे
दिपक उर्फ भैय्याजी धनाजी जगताप (वय-26 रा. मु.पो. रांझे ता. भोर), हर्षल दिलीप चव्हाण (वय-22 सध्या रा. मु.पो. ढाकाळी पणदरे, ता. बारामती मुळ रा. मु.पो. संभाजी चौक खंडाळा, जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी दिपक उर्फ भैय्याजी धनाजी जगताप हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी 4 गंभीर गुन्हे दाखल आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,वडगाव बु येथील फनटाईम थिएटरच्या मागील बाजूस असलेल्या कॅनॉलच्या रोडवर दोन व्यक्ती गावठी पिस्टल घेऊन थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता जगताप याच्या कमरेला 40 हजार रुपये किमतीचे पिस्टल आणि खिशात 600 रुपयाचे दोन जिवंत काडतुसे सापडली. तर हर्षल चव्हाण याच्याकडे 30 हजार रुपये किमतीचे पिस्टल आणि 300 रुपये किमतीचे एक जिवंत काडतुस सापडले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग राजेंद्र डहाळे,
पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पोर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे,
पोलीस निरीक्षक गुन्हे प्रमोद वाघमारे यांच्या मागदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक कुलदिप संकपाळ , पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी,
शंकर कुंभार, सचिन माळवे, किशोर शिंदे, सागर भोसले, इंद्रजित जगताप, सुहास मोरे, अमोल पाटील, अमित बोडरे, विकास पांडोळे, विकास बांदल, अविनाश कोंडे, देवा चव्हाण यांच्या पथकाने केली.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!