लग्नानंतर सत्यनारायण पूजा होताच नवरदेवाची आत्महत्या

बीड : शनिवारी मोठ्या थाटात लग्न केल्यानंतर नवरी-नवरदेवाने नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी आज सत्यनारायण पूजा करण्यात आली. मात्र, सत्यनारायण पूजा संपताच नवरदेवाने शेतात जाऊन आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या  केल्याची धक्कादायक घटना सोमवारी ( दि. २२) रोजी दुपारी  नित्रुड येथे घडली.

पांडुरंग रामकिसन डाके (वय २६) असे आत्महत्या केलेल्या नवरदेवाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,नित्रुड येथील पांडुरंग रामकिसन डाके हा शेती व किराणा दुकानाचा व्यवसाय करत होता. शनिवारी (ता.२०) माजलगाव येथील मंगल कार्यालयात त्याचे थाटामाटात लग्न झाले. यानंतर आज सोमवारी वधू-वरांकरीता सत्यनारायण महापूजाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त नातेवाईकांना जेवणाचे निमंत्रण देण्यात आले.

सत्यनारायण पूजा आटोपल्यानंतर नवरदेवाने जेवण केले आणि पाय दुखत असल्याचे सांगत शेतात जाऊन येतो म्हणत त्याने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजारील शेतकऱ्याने सदरील घटना डाके कुटूंबीयांना सांगितली. यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना करीता ग्रामीण रूग्णालयात पाठविला असुन आत्महत्येचे कारण मात्र समजु शकले नाही. दरम्यान हळद अंगावरील फिटण्याआधीच नवरदेवाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.