दोघावर डोक्यात लोखंडी रॉडने वार; एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
पुणे : एकाच रुममध्ये राहणार्या तरुणाने आपल्या दोन साथीदारांवर डोक्यात लोखंडी रॉडने वार केला. त्यात एकाचा मृत्यु झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना वारजे येथील न्यू अहिरे गावातील गणपती माथा बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.
रामपूजन महेंद्रर शर्मा (वय २२, रा. मुळगाव शंकरपूर, दरभंगा, बिहार) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर राम भरोस शर्मा (वय २१) हा जखमी झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघेही मुळचे बिहारमधील राहणारे आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते तिघे एकत्र राहत होते. रामपूजन हा सुतारी काम करीत असत. त्यांच्यामध्ये काही कारणावरुन वाद झाला होता. त्यानंतर आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास हरिकुमार शर्मा याने रामपूजन व रामभरोस यांच्या डोक्यात कठीण वस्तूने वार केले. त्यात रामपूजन याचा मृत्यु झाला. ही माहिती मिळताच वारजे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रामभरोस याला पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी आरोपींला ताब्यात घेतले आहे. रामभरोस याची फिर्याद घेण्यात येत असून पोलीस निरीक्षक अमृत मराठे अधिक तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!