कोल्डींक्समध्ये गुंगीचे औषध टाकून महिलेवर बलात्कार, पिंपरी चिंचवडमधील घटना
पिंपरी चिंचवड : शादी डॉटकॉम या लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवरून ओळख झालेल्या व्यक्तीने महिलेला लग्नाचे अमिष दाखविले. त्यानंतर बंगळूरू, पुणे येथे वेगवेगळ्या ठिकाणी नेले. तेथे कोल्डींक्समध्ये गुंगीचे औषध टाकून महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणी एकाच्या विरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २४ जानेवारी २०२० ते १ जानेवारी २०२१ या कालावधीत घडला आहे.
सचिन बलदेव शर्मा (रा. विकास कॉलनी, पटियाला, पंजाब) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपींची ओळख शादी डॉटकॉम या वेबसाईड वर झालेली होती. आरोपी सचिन याने महिलेला गुंगी येणारे औषध कोल्ड्रिंक्समध्ये मिसळून दिले. पिडीत महिला बेशुद्धावस्थेत असताना तिच्या संमतीशिवाय शरीरसंबंध प्रस्थापीत केले. तसेच आरोपी याने फिर्यादी यांना लग्न करण्याचे अमिष दाखवुन बँगलोर, पुणे येथे वेगवेगळ्या ठिकाणी वेळोवेळी नेवुन फिर्यादी यांच्याशी शरीरसंबंध ठेवुन फिर्यादी यांची फसवुणुक केली. त्यामुळे पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!