चोरीच्या गुन्ह्यात महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला अटक

पुणे : जबरी चोरीच्या गुन्ह्यात महिन्यापासून फरार असलेला सराईताला स्वारगेट पोलिसांनी  गुलटेकडी येथील मीनाताई ठाकरे वसाहतीमधून अटक केली आहे. अदनान कुरेशी (रा गुलटेकडी पुणे) असे अटक करण्यात आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जबरी चोरीच्या गुन्ह्यात महिन्यापासून फरार असलेला आरोपी अदनान कुरेशी हा मीनाताई ठाकरे वसाहत गुलटेकडी या ठिकाणी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेवुन दाखल गुन्ह्याबाबत अधिक चौकशी करता त्याने गुन्हयाची कबुली दिली आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार भोसले करत आहेत.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर व पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ ,पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले ,तुषार भोसले पोलिस अंमलदार कुंभार,धावरे ,शेख खेदांड, दळवी, तितमे, बडे,भोकरे,गोडसे साळवे,वाबळे,सरक खोमणे यांच्या पथकाने कामगीरी केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.