भिगवण संविधान भवनासाठी ४० लाख रुपयांचा निधी देणार- राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

भिगवण  : भिगवण (ता.इंदापुर) येथे लवकरच भव्य संविधान भवन उभे केले जाणार असुन त्यासाठी आपण खास बाब म्हणुन ४० लाखाचा निधी देणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भिगवण येथे अमर बौद्ध युवक संघटना यांच्या वतीने भारतीय संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पुजन व संविधान वाचन कार्यक्रमात केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप नागरिकांना व पोलिस अधिकारी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या कार्यक्रमादरम्यान विजय सरपाते यांचा भीम गीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.तसेच राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा खजिनदार सचिन बोगावत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.त्याचबरोबर राष्ट्रवादीचे युवा नेते अजिंक्य माडगे यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना पुस्तक, वही व पेन वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

यावेळी पुणे जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, विक्रम शेलार,सचिन बोगावत यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास पुणे जिल्हा परिषदेचे हनुमंत बंडगर,भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार,तक्रारवाडीचे सरपंच सतीश वाघ,इंदापूर तालुका राष्ट्रवादी उपाध्यक्ष धनंजय थोरात,इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष विजयकुमार गायकवाड ,मा.संरपच प्रशांत शेलार,अजिंक्य माडगे,प्रदीप वाकसे,चंद्रशेखर पवार,बापुराव थोरात,महेश शेंडगे,प्रमोद नरुटे,शरद चितारे,प्रदीप बोरा ,मनोज राक्षे,नितीन काळंगे,रोहित होळकर,मा. सरपंच वंदना शेलार,अरुणा धवडे,ग्रामपंचायत सदस्या निलिमा बोगावत ,डॉ. महेश गाढवे,डॉ. अमोल खानावरे,डॉ. तुळशीदास खारतोडे,आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

कार्यक्रमाचे आयोजन अमर बौद्ध युवक संघटनेचे कार्यकर्ते व भिगवण पत्रकार संघाचे मा.अध्यक्ष अमोल कांबळे,रोहित शेलार,संदीप वाघमारे,किरण कांबळे,विशाल शिंदे,अजय शेलार,मंगेश शेलार,संघर्ष धेंडे,प्रेम लोंढे,शुभम शेलार,मंगेश शेलार,गणेश शेलार,रोहन निकाळजे,सनी शेलार आदी कार्यकर्त्यांनी केले होते.

संविधान वाचन दादासाहेब थोरात व जान्हवी पोळ यांनी केले.
सुत्रसंचलन गणेश शेलार प्रास्ताविक सचिन बोगावत यांनी तर आभार गौतम शेलार यांनी मानले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.