पुण्यात 52 वर्षीय व्यक्तीचं अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवून लज्जास्पद वर्तन; चंदननगर परिसरातील घटना

पुणे : पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी आणखी एक घटना समोर आली आहे.  एका ५२ वर्षीय व्यक्तीनं १३ वर्षाच्या मुलीला कारमध्ये बसवून तुला जेवायला घेऊन जातो़ नवीन कपडे घेतो, असे बोलून तिच्याबरोबर लज्जास्पद वर्तन करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

भीमराव शंकर पिंपळे (वय ५२, रा. लोहगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पिडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ वर्षीय पीडित मुलगी कोंढवा येथील एका शाळेची विद्यार्थिनी आहे. आरोपी भीमराव हा फिर्यादीच्या मुलीचा तोंडओळखीचा आहे. गुरुवारी सकाळी मुलगी मुंढवा येथील शाळेत गेली असताना आरोपीने तिला शाळेच्या गेटच्या बाहेर बोलावले. तिला त्याने कारमध्ये बसायला सांगितले

त्यानंतर त्याने मुलीला त्याच्या मोबाईलवर फोन करायला सांगितला. शाळेत येताना सायकल आणू नको. तू वडगाव शेरी शेवटचा बसस्टॉप येथे ये. मी तुला माझे कारमधून शाळेत सोडतो. तसेच तुझी शाळा सुटल्यानंतर तुला जेवण करायला घेऊन जातो व तुला नवीन कपडे घेतो, असं आमिष दाखवलं. यावेळी आरोपीनं पीडितेला अश्लील स्पर्श करत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. घरी गेल्यानंतर, पीडित मुलीनं तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला आहे. या घटनेची माहिती मिळताच पीडित मुलीच्या आईनं त्वरित चंदननगर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी पोक्सोसह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत नराधम आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे. पोलीस उपनिरीक्षक काळे अधिक तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.