वाहनचोरी करणारा सराईत गुन्हेगा जेरबंद ; गुन्हे शाखा युनिट सहाची कामगिरी

पुणे : वाहनचोरी करणा-या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा युनिट सहाच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे.  त्यांच्याकडुन ३ मोटार सायकल व एक रिक्षा असा ६२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बाळु राणबा गोडसे (वय २८ रा. मु.पो. टाकळी लोणार ता.श्रीगोंदा, जि अहमदनगर सध्या रा. बो-हाटे नगर,एस.आर.पी.एफ ग्रुप ७ च्यामागे, दौंड,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलिस  हद्दीमध्ये गस्त करत असताना त्यांना माहिती मिळाली की वाहन चोर नामे बाळु गोडसे रा. बो-हाटे नगर, दौंड, याचेकडे चोरीची वाहने असुन तो वाडे बोल्हाई, डोंगर माथा येथे येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

त्यांचा ताब्यात ३ मोटार सायकली व एक रिक्षा असे मिळुन आल्याने सदरच्या मोटार सायकल व रिक्षा बाबत त्यास विश्वासात घेवुन पोलिसांनी सखोल चौकशी करता, त्याने सदरची वाहने पुणे शहरातुन, येरवडा विभागातुन रिक्षा, शिवाजीनगर मंगला थेटरच्या पाठीमागुन पॅशन गाडी, हडपसर हददीतुन हिरो होन्डा स्प्लेंडर तसेच पळशी रोड शिरवळ ता. खंडाळा, जि सातारा येथुन पल्सर गाडी चोरल्याचे सांगितले. त्यांच्याकडुन ३ मोटार सायकल व एक रिक्षा असा ६२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह-आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त श्रीनिवास घाडगे, सहा.पोलीस आयुक्त, गुन्हे २ लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट-६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सपोनि नरेंद्र पाटील, पोउनि सुधीर टेंगले, अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन
मुंढे, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.