व्हिडिओ बनावट अल्पवयीन मुलीवर तिच्या प्रियकरासह अन्य तरुणाने केला बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना
पुणे : पुण्यातील वडगाव शेरी परिसरात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे.याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.विशेष म्हणजे या प्रकरणी मुलीच्या प्रियकराला देखील अटक करण्यात आली.
अमित अबदेश यादव (वय- 18) आणि धनंजय नामदेव रोकडे (वय- 38) असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पिडीत मुलीने फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अमित याचे 2019 पासून पीडित मुलीशी प्रेमसंबंध होते. दरम्यान आरोपी अमितने 4 ऑगस्ट रोजी आरोपी अमितने पीडित मुलीला वडगाव शेरी येथील अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीत नेलं होतं. तिथं दोघांनी शरीरसंबंध ठेवले. त्याचवेळी इमारतीत असलेल्या आरोपी धनंजय रोकडेने दोघांचा व्हिडीओ बनवला. त्यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने पीडित तरुणीला धमकावलं. तसेच जबरदस्तीने शरीर संबध ठेवण्यास पीडितेला भाग पाडलं.
दरम्यान हे सगळ सुरू असताना प्रियकरही यात समील झाल्याचं समोर आलं आहे. आरोपी तरुण प्रेयसीवर बलात्कार करत असताना, प्रियकर तरुणाने बलात्काराचा व्हिडीओ बनवला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ त्याने आपल्या मित्रांच्या मोबाईलवर पाठवून मुलीची बदनामी केली. याप्रकरणी पीडितेनं येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!