कोथरुड भागात चरस व एम डी अंमली पदार्थाची तस्करी करणारे दांम्पत्य जेरबंद ;

पुणे : कोथरुड भागात चरस व एम डी अंमली पदार्थाची तस्करी करणारे पती-पत्नीस गुन्हे शाखेच्या अमली विरोधी पथक 1 ने अटक केली आहे. त्यांच्याकडुन 13 लाख 40 हजारांचे चरस व एम.डी. हे अंमली पदार्थ, कार व ईतर ऐवजासह एकूण 19 लाख 5 हजार 420 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

मोहम्मदअफजल अब्दुलसत्तार नागोरी (वय 40, धंदा – व्यवसाय, रा, मुळ पत्ता 112 झकेरिया मश्जिद स्ट्रीट, दुसरा मजला, रुम नं.21 मुंबई 9 सध्या राहणार अमीर बिल्डींग 3 रा मजला, रुम नं.१२, खडक मुंबई) व  शबाना मोहम्मदअफजल नागोरी (वय 38 ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार,  शनिवारी अंमली पदार्थ विरोधी
पथकाकतील पोलिस हे कोथरुड पोलीस स्टेशच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना लोहिया- जैन आय टी पार्कचे विरुध्द बाजुकडील, चांदणी चौकाकडे जाणारे सार्वजनिक रोडवर अंमली पदार्थ रेकॉर्डवरील आरोपी मोहम्मद अफजल अब्दुलसत्तार नागोरी हा एका होन्डा सिटी कार मध्ये एक महिला व लहान मुलीसह संशयितरित्या थांबला असताना दिसला. त्यांना संशयावरुन ताब्यात घेतले असता ते दोघेही पती पत्नी असुन त्यांचे सोबत त्यांची लहान मुलगी ( 6 वर्षे) ही असल्याचे निदर्शनास आले.

त्याच्याकडे कोणतातरी अंमली पदार्थ असल्याचे संशय पोलिसाना आल्याने  त्याची झडती घेतली असता मोहम्मदअफजल नागोरी हा त्याचे ताब्यात 8 लाख 40 हजार रुपयांचे 55 ग्रॅम 970 मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) पावडर दोन मोबाईल फोन, होन्डा सिटी कार असा ऐवज व शबाना मोहम्मदअफजल नागोरी  हिचे ताब्यात 5 लाख रुपयांचा 506 ग्रॅम 10 मिलीग्रॅम चरस हा अंमली पदार्थ ,एक ऍपल कंपनीचा मोबाईल फोन, रोख रुपये 3420 व काळया रंगाची लेदर पर्स असा एकुण सर्व मिळुन 19 लाख 5 पाच 420 चा ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या जवळ बाळगताना मिळुन आला. त्यामुळे त्याचे विरुध्द कोथरुड पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. ऍक्‍ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांची दिनांक 30 नोव्हेंबर पर्यत पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त(गुन्हे)  रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहा.पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार संदिप जाधव, मनोज सालुंके, राहुल जोशी, प्रविण उत्तेकर,मारुती पारधी,विशाल दळवी,पांडुरंग पवार, नितेश जाधव,रेहाना शेख, योगेश मोहिते यांनी केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.