व्याजाच्या पैशातून धारदार हत्याराच्या साह्याने वार करून एकाचा खून ; कात्रज परिसरातील घटना

पुणे: व्याजाने घेतलेल्या पैशाचे व्याज दिले नाही याचा राग धरून धारदार हत्याराच्या साह्याने वार करून एकाचा खून केला.  हि घटना कात्रज नवले ब्रीज दरम्यान सेवा रस्त्यावर रविवारी रात्री ११.३० वाजता घडली.

शरद शिवाजी आवारे ( वय ४३ , रा. संभाजीनगर, धनकवडी) असे खून झालेल्याचे नाव आहे.या प्रकरणी प्रशांत महादेव कदम (वय ३१ रा धनकवडी यांनी दिलेल्या फिर्यादी दिली आहे. त्यानुसार प्रकाश शिंदे सह एका अनोळखी व्यक्ती विरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद आवारे यांनी प्रकाश शिंदे याच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्याचे व्याज शरद दर महिन्याला देत होता. मात्र, या महिन्यात त्याने व्याज दिले नाही.
त्यामुळे प्रकाश शिंदे याने शरद आवारे याला कात्रज रोडवरील चंद्रसखा वेअरहाऊसजवळ बोलावले होते. तेथे त्यांच्यात पुन्हा वाद झाला. तेव्हा चिडलेल्या प्रकाश शिंदे व त्याच्या साथीदाराने धारदार हत्याराने शरद याच्यावर सपासप वार केले व ते पळून गेले. जखमी अवस्थेत शरद याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.