विवाहितेचा मृत्यू, अंगावरती मारहाणीचे व्रण ; पतीसह सासरचे फरार

बुलढाणा : राज्यात महिला अत्याचारांच्या रोज घटना समोर येताना दिसून येत आहेत. याशिवाय महिलांच्या अत्याचारांमध्ये कौटुंबीक अत्याचाराचे प्रमाण सुद्धा मोठा प्रमाणात होताना दिसून येत आहे. अशीच एक घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथून समोर आली आहे. गळफास लागलेल्या स्थितीत खामगाव येथील एका विवाहितेला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान रात्री त्या विवाहित महिलेचा मृत्यू झाला आहे.

मात्र सदर मृत महिलेच्या अंगावरती मारहाण झाल्याचे व्रण आढळून आल्याने विवाहितेची सासरकडील लोकांनी तिची हत्या केली असल्याचा आरोप मृतक महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी खामगाव पोलिसात पतीसह पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी सध्या फरार आहेत.

श्रध्दा गजानन वैतकार (वय 24, रा. गोपाळनगर, खामगाव ) असे या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी महिलेचे वडिल भानुदास मोतीराम काळींगे यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार गजानन रामदास वैतकार (पती), रामदास वैतकार (सासरा), उषा बैतकार(सासू ),दीपा प्रभाकर पातोंड(नणंद) व प्रभाकर पातोंड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या विवाहितेस सासरच्याकडून कार घेण्यासाठी माहेरून 2 लाख घेऊन येण्याचा तगादा लावण्यात आला होता. यासाठी तिचा सतत पती व सासरच्याकडून शारिरीक व मानसिक छळ केला जात होता. दरम्यान सदर विवाहितेता हि राहत्या घरात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आली. तिला नातेवाईकांनी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती केले. दरम्यान उपचार सुरु असतांना रात्री तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी खामगाव पोलिसात पतीसह पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी सध्या फरार आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.