सरपंच, उपसरपंचाच्या त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याची आत्महत्या ; परिसरात खळबळ
ओतूर : सरपंच व उपसरपंच यांच्या त्रासाला कंटाळून जुन्नर तालुक्यातील अहिनवेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या शिपायाने ग्रामपंचायत कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी मयत इसमाने दोन सुसाईड नोट स्वतःच्या खिशात लिहून ठेवल्यामुळे आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले आहे.
प्रकाश शिवराम गोंदे (वय ४७ रा .अहिनवेवाडी ता.जुन्नर ) असे आत्महत्या केलेल्या ग्रामपंचायत शिपायाचे नाव आहे. यासंबंधी अहिनवेवाडीच्या सरपंच भिमाबाई नंदकुमार खंडागळे व उपसरपंच स्वप्नील वसंत अहिनवे दोघेही (रा.अहिनवेवाडी ता.जुन्नर) यांच्यावर ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पत्नी नंदा प्रकाश गोंदे यांनी ओतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे
मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रकाश गोंदे हे सन २००१ पासून अहिंनवेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत होते. त्यांना सन २०२० मध्ये अर्धांगवायूचा झटका येऊन गेल्यामुळे त्यांचे अर्धे शरीर काम देत नव्हते. त्यामुळे त्यांना काम करण्यात अडचणी येत होत्या. सरपंच आणि उपसरपंच स्वप्नील अहिनवे नेहमी अपमानास्पद वागणूक देत होते. गोंदे यांना दवाखाना आणि औषधोपचार यासाठी राहणीमान भत्त्याची गरज होती. तो त्यांनी सरपंच आणि उपसरपंच यांच्याकडे मागितला. तो देण्यास दोघांनी नकार दिल्याने गोंदे यांनी आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे. पुढील तपास जुन्नर चे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!