सराईत गुन्हेगार मंगेश माने टोळीवर मोक्का कारवाई ; पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची 62 वी मोक्का कारवाई

पुणे : कोंढवा परिसरात दहशत निर्माण करुन खुनाचा प्रयत्न, खंडणी उकळणे असे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगार मंगेश माने आणि त्याच्या पाच साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली ही 62 वी मोक्का कारवाई आहे.

मंगेश अनिल माने (वय 26, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी), लाडप्पा ऊर्फ अखिलेश ऊर्फ लाड्या चंद्रकांत कलशेट्टी (वय 20, रा. गोकुळनगर, कोंढवा बुद्रुक), सुरज अंकुश बोकडे (वय 22, रा.
माऊलीनगर, कोंढवा), सागर कृष्णा जाधव (रा. सासवड व अप्पर बिबवेवाडी), प्रथमेश रमेश हनाळनंदे (रा. टिळेकरनगर, कोंढवा), प्रतिक रमेश हनाळनंदे (रा. टिळेकरनगर, कोंढवा) अशी मोक्का कारवाई केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यांवर वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही ते कारवाईस धजावत नव्हते. तसेच त्यांच्या वर्तनात ही सुधारणा होत नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्याकडे पाठवला होता. त्यानुसार त्यांच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली 62 मोक्का कारवाया करण्यात आल्या.

 

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.