Instant PAN: 10 मिनिटात मिळणार पॅनकार्ड , जाणून घ्या कसा करावा अर्ज
मुंबई : आजच्या दिवसांमध्ये सर्वच छोट्या मोठ्या कामांसाठी पॅन कार्डची गरज भासत असते. पॅन कार्ड शिवाय अनेक महत्त्वाची कामे रखडली जातात. परिणामी प्रचंड नुकसानाचा सामना तर कारावा लागतो. मात्र पॅन कार्ड नसल्यामुळे वेळ देखील वाया जातो. पण आता तुम्हाला अर्जंट पॅनकार्डची आवश्यकता असेल तर तुम्ही केवळ 10 मिनिटात सुद्धा पॅनकार्ड मिळवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्ड आणि मोबाईल नंबरच्या मदतीने अर्ज करावा लागेल. आता instant PAN Card मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी देण्याची देखील गरज नाही.
काय आहे instant PAN Card
इनकम टॅक्स विभागाने आपलं ई-फायलिंग पोर्टलवर एक नवीन प्रक्रिया सुरु केली आहे, ज्यात आधार नंबर आणि पॅनकार्डचं आकलन केलं जातं. ही सुविधा तेव्हाच घेता येऊ शकते, जेव्हा खालील अटी आणि शर्थी तुम्ही पूर्ण कराल.
1. या आधी तुम्ही पॅनकार्ड घेतलेलं नसावं
2. तुमचा मोबाईलनंबर तुमच्या आधारशी लिंक असावा
3. आधार कार्डवर तुमची जन्म तारीख, महिना आणि वर्ष यांची नोंद दिसली पाहिजे
4. पॅनकार्डसाठी अर्ज करताना तो अल्पवयीन नसावा.
या सोप्या स्टेप करा फॉलो
-Instant e-PAN कार्डसाठी प्रथम ‘Instant PAN through Aadhaar’ सेक्शनवर किक्ल करा.
आता ‘Get New PAN’ ऑपशनवर क्लिक करा.
– आता आधार कार्ड नंबर नोंदवा. नंतर Captcha नोंदवा.
– नंतर लिंक्ड मोबाइल नंबरद्वारे ओटीपी generate होईल.
– यानंतर कार्ड अॅप्लीकेशनमध्ये email ID चे ऑपशन भरा.
– नंतर आधार नंबर आणि मोबाइल नंबर UIDAI सोबत ई-केवायसी सामायिक होईल.
– नंतर पॅन नंबर Generate होईल.
– आता Check Status/ Download PAN वर जाऊन आधार नंबर सबमिट करा.
– नंतर मेल आयडीद्वारे पॅनचे PDF डाऊनलोड करता येईल.
NSDL च्या वेबसाईटवरून सुद्धा करू शकता अर्ज –
जर तुम्हाला पॅनकार्डची तातडीने गरज नसेल तर तुम्ही NSDL च्या वेबसाइटवर जाऊन पॅनकार्डसाठी अप्लाय करू शकता. यासाठी नॉर्मल प्रोसेस करावी लागेल. जी पूर्ण केल्यानंतर 15 ते 20 दिवसात PAN Card कुरियर किं पोस्टाने घरी येईल.
ज्यांनी यापूर्वी पॅनकार्ड काढलं आहे, त्यांच्यासाठी ही सेवा नाहीय.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!