पूर्व हवेलीतील बंटी बबलीची जोडी घालतेय धुमाकूळ-खोटे गुन्हे दाखल करू अशी धमकी देऊन करतायेत लूट

पुणे : पूर्व हवेलीतील लोणी काळभोर व लोणी कंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक दांपत्य गुन्हे शाखा व एका संघटनेच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक करीत असल्याचा तक्रारी अर्ज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पुणे शहर महिला आघाडी अध्यक्षा शशिकला वाघमारे यांनी पुणे पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता यांना केला आहे.

बंटी-बबली (रा.कदमवाकवस्ती, ता.हवेली) असे पती-पत्नी हे दाम्पत्य काही संघटनेच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करीत असल्याची चर्चा बरेच दिवस पूर्व हवेलीत सुरू होती. परंतु त्यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात कोणीही पुढे येत नसल्याने काही समाजसेवक व पत्रकारांनी याबाबतीत स्टिंग ऑपरेशन केल्यावर बऱ्याच धक्कादायक बाबी समोर आल्या यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी लोणी कंद परिसरातील एका गृहस्थाला या बंटी-बबलीच्या जोडीने तू बुवाबाजी जादूटोणा करून लोकांना फसवून त्यांची लूट करतो यांच्या आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत. तुझ्यावर गुन्हा दाखल करतो अश्या धमक्या देऊन त्यांच्या जवळील अंगठ्या व चैन हिसकावून घेतले, याविषयी कुठे वाच्यता केल्यास तुझी बदनामी करू अशी धमकी त्याला दिली, यातील पीडित म्हणून या गृहस्थाने याबाबत कुठे वाच्यता केली नाही. परंतु या बंटी बबलीचे कारनामे काही समाजसेवक व पत्रकारांच्या लक्षात आल्यावर त्यांनी याबाबत स्टिंग ऑपरेशन केले. या स्टिंग ऑपरेशनमध्ये या बंटी बबलीच्या जोडीने या व्यतिरिक्त अजून बऱ्याच जणांना फसविले असल्याच्या बाबी समोर आल्या. यामध्ये लोणी काळभोर येथील एका गृहस्थाच्या कागदपत्रांचा वापर करून २ लाख कर्ज काढले. जेव्हा बँक वसुलीधारांनी मूळ माणसाकडे कर्जाच्या परतफेडीचा तगादा लावला त्यावेळी कर्जधारी गृहस्थाने या बंटी बबलीकडे कर्ज भरून टाकायची विनंती केल्यावर त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. तर या बंटी बबलीचे कारनामे पत्रकारांसमोर आणल्याने एका युवकास तुझ्या गाडीमध्ये विनापरवाना पिस्तुल ठेऊन तुझ्यावर कारवाई करायला लावेल अशी धमकी दिली.म्हणून यातील पीडितांनी आरपीआयच्या (A) महिला अध्यक्षा शशिकला वाघमारे यांच्याकडे मदतीचे मागणी केली. गुन्हे शाखा युनिट सहामध्ये आमचा चांगला संपर्क आहे व आमच्या संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करून बदनामी करू अश्या धमक्या देऊन नागरिकांकडून पैसे उकळण्याचे काम ही बंटी बबलीची जोडी गेल्या दोन वर्षांपासून करीत आहे. या बंटी बबलीमुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असल्याने यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी पुणे पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता यांकडे केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.