बहिण-भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना, भोसरीत भावाकडून तीन वर्षीय बहिणीवर बलात्कार

पिंपरी चिंचवड: मुली आज खरंच सुरक्षित आहेत का? हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. पिंपरी चिंचवड मधील भोसरीत तर बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. नराधम भावाने अवघ्या तीन वर्षीय बहिणीवर बलात्कार केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.हा प्रकार ऑगस्ट महिन्यात घडला आहे.

या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईने गुरूवारी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी विधीसंघर्षीत बालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे आई वडील ऑगस्ट महिन्यात ( नक्की तारीख माहिती नाही )कामानिमित्त गेले होते. त्यावेळी बारा वर्षीय मुलाने बहिणीवर लैंगिक अत्याचार केला. मात्र याबाबत घरच्यांना काहीच कल्पना नव्हती.गुरूवारी मुलीला त्रास झाल्याने तीला रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी तपासणी केली असता तीच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर मुलीला विश्‍वासास घेत विचारणा केली असता दादाने हे कृत्य केल्याचे सांगितले. त्यांनी मुलाकडे विचारणा केली असता त्यानेही केलेल्या कृत्याची कबुली दिली. आरोपीवर शारीरीक लैंगिक अत्याचार केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.