लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार ; तरुणीचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न

नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून महाविद्यालयीन मित्राने तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केला. त्यानंतर प्रेमात दगा दिला त्यामुळे  निराश झालेल्या तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी बलात्कारासह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या युवतीची प्रकृती धोक्याबाहेर आहे. सागर सतीश सदाफल (वय ३०) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी सागर सदाफल (३०) आणि २८ वर्षीय तरुणी एकाच कॉलेजला असल्याने दोघांची ओळख झाली. एकाच भागात राहत असल्याने घरी जाणे येते होते. त्यामुळे ते एकाच गाडीवर कॉलेजला जायचे. दरम्यान त्यांनी आपण शिक्षण घेतल्यानंतर लग्न करणार असल्याचे घरच्यांना सांगितले. शिक्षणानंतर दोघेही नोकरीवर लागले. सतीश शासकीय नोकरीत असून तरुणी खासगी कंपनीत आहे. दोघेही अभियंता आहेत.

दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीवर लागल्यानंतर त्यांच्यात दुरावा आला. सतीशने गुपचूप दुसऱ्या तरुणीसोबत साक्षगंध उरकले. ही बाब समजल्यानंतर निराश झालेल्या युवतीने झोपेच्या गोळ्या खाऊन स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न केला.आत्महत्या प्रयत्नाचे प्रकरण बेलतरोडी पोलिसांकडे गेले. पोलिसांनी ३० नोव्हेंबर रोजी मेडिकलमध्ये जाऊन युवतीचे बयाण नोंदविले. प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार केल्याचे युवतीने सांगितले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कारासह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.