पिंपरी चिंचवडमध्ये पपलु रम्मी जुगार अड्ड्यावर छापा; 18 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवड : पपलु नावाचा रम्मी जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी ३ लाख ०१ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी १८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाने पादुका वस्ती, च-होली खुर्द येथे शुक्रवारी (दि. ०३) करण्यात आली.
चालक-मालक संतोष काळुराम लोखंडे (वय ३५ रा. मु.पो. सोळु ता. खेड जि. पुणे), संदिप निवृत्ती सांडभोर (वय ३८ रा. मु.पो. राक्षेवाडी ता. राजगुरुनगर ता. खेड जि. पुणे, संतोष निवृत्ती बुट्टेपाटील (वय ३९ वर्षे रा. मु.पो. वहाळे ता. खेड जि. पुणे), अमोल मारुती माने (वय ३२ रा. चाकण चौक, धुंडरे आळी, आळंदी, पुणे), संजय धुमसिंग बारेला वय २३ रा. कृष्णा हेरिटेज ३०५ ए, संतनगर, भोसरी, पुणे), रामनारायण भगवान राऊत (वय ३६ रा. तापकीरनगर, देहूफाटा, आळंदी, पुणे), ऋषिकेश बालाजी चाफळे (वय ३० रा. पुंडरे आळी, आळंदी, पुणे), आसिफ फकीर शेख (वय २५ रा. सर्वे नंबर २०४/२०५ सिध्दार्थनगर, रामवाडी, पुणे), दिनेश रमेश देवकर (वय २६ रा. वडारवस्ती, विश्रांतवाडी, पुणे (जुगार खेळणारा इसम), प्रशांत जगन्नाथ रेड्डी (वय ३२ रा. कृष्णकांत तापकीर चाळ, चहोली फाटा, आळंदी, पुणे), शुभम नितीन
भालेराव (वय २० रा. कात्रज, कोढवा रोड, विघ्नहर्तानगर, सर्व्हे नंबर २९, लक्ष्मीनिवास, कात्रज, पुणे), कानिफनाथ लक्ष्मण चोपडे (वय २५ रा. गल्ली नंबर ४, शिवशंभोनगर, कात्रज, पुणे), दिपक नरसिंगराव तुकदे (वय २८ रा. ममता स्विटहोमचे वर, दिघी, पुणे ), सुरज बाळासाहेब नाईक (वय २८ रा. भारतमातानगर, दत्तकॉलनी, पुणे), सनी सुभाष भांडेकर (वय २८ रा. नालंदा हौसींग
सोसायटी, बिल्डींग नंबर १३, फ्लॅट नंबर ४०२, निगडी, पुणे), सोमनाथ बबरुवन वजरकर (वय २५ रा. ममता स्विटहोमचे वर, दिघी, पुणे), विशाल भालचंद्र भडकुंबे (वय २१ रा. भारतमातानगर, सर्वे नंबर ७५, सहकार कॉलनी नंबर २, दिघी, पुणे) तसेच पाहिजे नंदु घोलप पुर्ण (नाव माहित नाही वय अंदाजे ४० वर्षे रा. चहोली खुर्द ता. खेड जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पादुका वस्ती, च-होली खुर्द येथे पपलु नावाचा रम्मी जुगार सुरू.असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. यावेळी सर्व आरोपी रमी जुगार खेळताना दिसून आले. या कारवाईत पोलिसांनी शुक्रवारी (दि. ०३) याठिकाणी छापा टाकत १७ आरोपींना ताब्यात घेतले असून, एक आरोपी फरार आहे. पोलिसांनी एकूण १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी १ लाख ५८ हजार २०० रूपये रोख, १ लाख ४२ हजार रूपयांचे अँड्रॉईड मोबाईल फोन, १ हजार १२० जुगार खेळण्याचे साहित्य असे एकूण ३ लाख ०१ हजार ३२० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आळंदी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप-आयुक्त, (गुन्हे)डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, वपोनि देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभाग व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील सपोनि डॉ. अशोक डोंगरे, पोउपनि प्रदिपसिंग सिसोदे, पोउपनि धैर्यशिल सोळंके, पोलीस अंमलदार विजय कांबळे, संतोष बर्गे, नितीन लोंढे, सुनिल शिरसाट, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, राजेश कोकाटे, वैष्णवी गावडे, योगेश तिडके यांनी केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!