रेशन कार्डधारकांना मार्चपर्यंत मोफत धान्य मिळणार

पुणे : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची गरिबांना मोफत धान्य देण्याची मुदत आता वाढविण्यात आली असून, मार्चn२०२२ पर्यंत आता या योजनेचा लाभ घेता येईल. त्यामुळे शहरातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील लाभधारकांना येत्या मार्चपर्यंत दर महिन्याला प्रती व्यक्ती तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे, अशी माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गरीब आणि गरजू नागरिकांना पाच किलो मोफत धान्य देण्याचा निर्णय नोव्हेंबर २०२१ मध्ये घेतला होता. या योजनेची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत होती. राज्य सरकारने या योजनेला आता मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. प्राधान्यक्रम कुटुंबातील लाभधारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत पाच किलो धान्य वितरित करण्यात येणार आहे. यासोबतच प्रति व्यक्ती तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोफत वितरित करण्यात येणार आहे. रास्त भाव दुकानदारांना धान्याचे वितरण इ-पॉस मशिनद्वारे करणे अनिवार्य आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना २ रुपये किलो दराने गहू आणि ३ रुपये किलो दराने तांदूळ दिला जातो. मात्र, करोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या गरिबांची उपासमार होऊ नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत धान्याची योजना जाहीर केली. राज्य सरकारने एक महिना आणि केंद्र सरकारने दोन महिने असे तीन महिने मोफत धान्य देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र वेळोवेळी या योजनेची मुदत वाढविण्यात आली.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.