पुण्यात प्रचंड खळबळ ! भारती विदयापीठ परिसरात बांधकाम व्यावसायिकाचा भर दिवसा ६ गोळ्या घालून खून, धक्कादायक कारण समोर
पुणे : पुण्यातील भारती विद्यापीठ ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चंद्रभागा नगर चौकात एक थरारक घटना समोर आली आहे. येथील बारामती मतदारसंघ काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष व बांधकाम व्यावसायिकाची भरदिवसा गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दुचाकीवरून अचानक आलेल्या मारेकऱ्यांनी व्यावसायिकावर तब्बल सहा गोळ्या झाडल्या आहेत. त्यामुळे संबंधित तरुण घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेत संबंधित व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला आहे. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली
समीर मनूर शेख, (वय २८ वर्षे, रा. फालेनगर, भारती विद्यापीठ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित हत्या आर्थिक कारणातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीरला नुकतेच बारामती मतदारसंघ काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष म्हणून पद मिळाले होते. याशिवाय तो बांधकाम व्यावसायिक म्हणून सुद्धा काम करत होता. समीरच्य घरी आई वडील, पत्नी आणि सहा महिन्याचा मुलगा असा परिवार आहे.
मृत समीर मनूर शेख याने आरोपी मेहबूब बलुर्गी या आपल्या मित्राकडून 5 लाख रुपये उसने घेतले होते. मृत समीर याने यातील अडीच लाख रुपये मेहबूबला परत दिले. पण उरलेले पैसे देण्यासाठी मात्र समीर टाळाटाळ करू लागला. विशेष म्हणजे मृत समीर अंगावर भरपूर सोनं घालून परिसरात ‘गोल्डमन’ बनून फिरतो. पण आपले अडीच लाख रुपये देत नाही.
यामुळे मेहबूबचा समीरवर राग होता. यातूनच संतापलेल्या मेहबूब याने दोन महिन्यांपूर्वी समीरची गळ्यातील सोन्याची चैन ओढण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे दोघांमधील वाद विकोपाला गेला. यातूनच घरातून बुलेट वर बाहेर पडलेला समीर हा चहा पिण्यासाठी चंद्रभागा चौकात आला होता. त्यावेळी मेहबूब याने समीरचा पाठलाग करून त्याला भयंकर मृत्यू दिला आहे. आरोपीनं समीरला पाठीमागून पकडून जवळून 6 गोळ्या घालल्या आहेत.यात समीर गंभीर झाला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला.
भरदिवसा गोळ्या घालून व्यावसायिकाची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मेहबूबला ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
बारामती लोकसभा मतदार संघाचे अल्पसंख्यांक अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती
समीर मनूर यांची काँग्रेस पक्षाच्या बारामती लोकसभा मतदार संघाचे अल्पसंख्यांक अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली होती. त्याचबरोबर आंबेगाव परिसरातील दत्तनगरमध्ये पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्या हस्ते जन संपर्क कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात आले होते. मनूर यांच्या खुनामागे आर्थिक देवघेव असल्याचे कारण स्पष्ट होत असून या प्रकरणी एका संशयित व्यक्तीला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मेहबुब भळुरगी असे ताब्यात घेतलेल्या व्यक्ती चे नाव आहे. तो समीर चा मित्र होता.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!