बर्थडे पार्टी निमित्त जंगलात नेऊन तरुणीला दारू पाजून केला बलात्कार ; पुण्यातील तळजाई जंगलातील धक्क्यादायक घटना

पुणे : मित्राने वाढदिवस असल्याचे सांगत मित्रासह पुण्यातील  एका २२ वर्षीय तरुणीला तळजाई येथील जंगलात नेऊन त्याठिकाणी तिला दारु पाजून त्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पाेलीसांनी आरोपीला अटक केली आहे.

शुभम सिताराम शिंदे (वय-१९,रा.धनकवडी,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी कात्रज येथील एका २२ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणी एकमेकांच्या ओळखीची आहेत. गेल्या काही काळापासून दोघं चांगले मित्र बनले होते. दरम्यान, ५ डिसेंबर रोजी घटनेच्या दिवशी आरोपी शुभम याने वाढदिवसाची पार्टी असल्याचं सांगून पीडितेला तळजाईच्या शेवटच्या बस स्थानक परिसरात बोलावलं होतं. ठरल्याप्रमाणे सायंकाळी पाचच्या सुमारास पीडित तरुणी संबंधित ठिकाणी आली. यानंतर आरोपी शुभम याने आपला मित्र प्रतीक माने आणि फिर्यादी तरुणीला तळजाईच्या जंगलात घेऊन गेला.

याठिकाणी गेल्यानंतर संबंधित सर्वजण दोन ते अडीच तास जंगलातच दारू पीत बसले. पण कालांतराने थंडी वाढल्यानंतर, पीडित तरुणी आरोपी बसलेल्या ठिकाणीच शेजारी झोपी गेली. त्यावेळी आराेपी शिंदे याने तिच्याशी जवळीक साधत तरुणी प्रतिकार करत असताना ही तिला विवस्त्र करत तिच्याशी जबरदस्तीने शारिरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत तरुणीने घडलेल्या प्रकाराची कुटुंबीयांशी चर्चा करुन पाेलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पाेलीसांनी आराेपीला अटक केली आहे. याबाबत पुढील तपास सहकारनगर पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक स्वाती देसाई करत आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.