शरीरसंबंधांचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत उद्योजिकेकडून लाखोंची वसुली, आरोपी अटकेत

मुंबई : मुंबईच्या आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील नवऱ्यापासून वेगळं राहणाऱ्या एका  उद्योजक महिलेला तिच्या प्रियकराने शरीरसंबंधांचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपयांना लुबाडले. संबधित महिला ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ट्रेनर असून संबधित युवकाची भेट एका सेमिनारमध्ये झाली होती. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित महिलेनं आरे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली.

कृष्णकांत अखोरी ( वय 25) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी कृष्णकांत आखोरीला दिल्लीच्या संगम विहारमधून अटक केली आणि त्याला कोर्टात हजर केले आहे. हे त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला उद्योजिका आरे कॉलनीतील रॉयल पाम परिसरातील रहिवासी आहे. गेल्या काही वर्षांपासून तिचं आपल्या पतीसोबत पटत नसल्याने ती पतीपासून वेगळं राहत होती. दरम्यान 2016 साली पीडित महिला बिहारमध्ये एका व्यक्तिमत्व विकास सेमिनारसाठी गेली होती. त्यावेळी कृष्णकांत याच्याशी तिची ओळख झाली. कालांतराने दोघांमधील मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं होतं. पतीपासून वेगळं राहणाऱ्या महिलेला आरोपीनं आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत अनेकदा लैंगिक संबंध ठेवले. तसेच शरीर संबंध ठेवतानाचे अनेक व्हिडीओही आरोपीनं आपल्या मोबाइलमध्ये काढले. पण काही वर्षानंतर पीडित महिला आपल्या पतीसोबत पुन्हा एकत्र राहू लागली. त्यामुळे संतापलेल्या आरोपीनं संबंधित व्हिडीओ पतीला पाठवण्याची धमकी देत पीडित महिलेकडून चार लाख रुपये उकळले.

संबधित तरुण वारंवार महिलेकडे लैंगिक संबंधांची मागणी करत होता. महिलेने नकार देताच तरुणाने अश्लिल व्हिडिओ महिलेच्या पतीला पाठवून ५ लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली.

यानंतर महिलेने आरे पोलीस ठाण्यात कृष्णकांत अखोरी याच्याविरोधात तक्रार दाखल केली हाेती.. पोलिसांनी कलम 385, 354 (अ) आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करत तपास सुरु केला.

मोबाईल लोकेशनच्या आधारे कृष्णकांत अखोरी दिल्लीच्या संगम विहारमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर आरे पोलीस स्टेशनच पथक दिल्लीला रवाना झालं आणि त्यांनी कृष्णकांत आखरीला अटक केली. पोलिसांनी कृष्णकांत अखोरीला कोर्टात हजर केलं. जिथे कोर्टाने त्याला 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.