धक्कादायक ! मुलाकडून अन् सुनेकडून ८० वर्षाच्या आईला काठीने मारहाण, हात फॅक्चर

पुणे : आपल्या ८० वर्षाच्या आईला ६० वर्षाच्या मुलाने काठीने मारुन तसेच ५५ वर्षाच्या सुनेने चपलेने मारहाण करुन तिचा हात फ्रॅक्चर करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी मुलावर आणि सुनेविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ६ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता बुधवार पेठेत घडला.

निळकंठ गजानन पाबळे (वय ६०) आणि मिना निळकंठ पाबळे (वय ५५, रा. बुधवार पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शांताबाई गजानन पाबळे (वय ८०, रा. बुधवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीचा मोठा मुलगा आहे. सोमवारी रात्री ८ वाजता फिर्यादी घरात खाटेवर झोपल्या असताना मोठा मुलगा व त्यांची पत्नी हे तेथे आले. त्यांनी शिवीगाळ करुन “तू आमचा मुलगा सागर याला मारुन टाकण्याचा प्रयत्न करते” असे बोलून जमिनीवर पडलेली काठी घेवुन मुलाने आपल्या ८० वर्षाच्या आईच्या हातावर, अंगावर मारहाण केली. त्यांची सून मिना हिने चपलेने मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे. फरासखाना पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.