महिलेवर चाकूने वार करुन जबरी चोरी करणाऱ्या आरोपीस अटक, गुन्हे शाखा युनिट सहाची कामगिरी
पुणे : पाणी पिण्याचा बहाणा करुन महिलेवर चाकूने वार करुन महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या चोरट्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट सहाने अटक केली आहे.ही घटना मंगळवारी (दि.7) पुण्यातील वाघोली येथील केसनंद रोडवरील एपिक सोसायटीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की, केसनंद रोड, वाघोली येथील एपिक सोसायटी मध्ये एका व्यक्तीने घरामध्ये घुसून एका महिलेवर चाकूने वार करून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले आहेत. या माहितीच्या आधारे पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी चोरी करणाऱ्या व्यक्तीला नागरिकांनी पकडून ठेवले होते. लोकांच्या ताब्यातून पळून जाणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने आईच्या आजारपणावर उपचार करण्यासाठी सोसायटीमधील प्लॅटमध्ये पिण्यास पाणी मागण्याच्या बहाणा करुन महिलेवर चाकूने वार करुन दागिने चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात दिले. जखमी महिलेवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे,
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर टेंगले, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!