सराईत वाहनचोरांना अटक ; मार्केटयार्ड पोलीसाची कामगिरी

पुणे :  मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एक दुचाकी जप्त करुन एक गुन्हा उघडकीस आणला आहे. ही कारवाई पुण्यातील मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर रिक्षा स्टँड येथे सापळा रचून करण्यात आली.

जैद जमीर दलाल (वय-20 रा. घोरपडी पेठ, मोमीनपुरा कब्रस्थान जवळ, पुणे) आणि जैद अमजद खान (वय-19 रा. गुरुवारपेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील तपासी पथक गुरुवारी (दि.2) हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांना माहिती मिळाली की, रिक्षा स्टँडजवळ दोन सराईत गुन्हेगार सुझुकी अ‍ॅक्सेस मोपेड गाडीवर आले आहेत. त्यांच्याकडून कोणतातरी गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीसांनी वाहन पोर्टल अ‍ॅपवर गाडीची माहिती मिळवली. गाडी मालकाच्या मोबाईलवर फोन करुन चौकशी केली असता गाडी चोरीला गेल्याचे सांगितले. तसेच याबाबत डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपींना डेक्कन पोलिसांच्या ताब्यात दिले

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण , पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.व्ही. देशपांडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सविता ढमढेरे यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक कदम, पोलीस हवालदार हिरवळे, जाधव, अनिस शेख, स्वप्निल कदम, संदिप सुर्यवंशी, लोणकर, अनिरुद्ध गायकवाड यांच्या पथकाने केली

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.