1.10 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त ;पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेची कारवाई

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकने मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एम्बरग्रीस म्हणजेच व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. या उलटीची किंमत तब्बल एक कोटी 10 लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे ही उलटी दोघांनी मोशी येथे विक्रीसाठी एकाला कुरियरने पाठवली होती. ही कारवाई सोमवारी (दि. 6) सकाळी मोशी टोलनाका येथे करण्यात आली.

जॉन सुनील साठे (वय 33, रा. मगरमळा, नाशिक रोड), अजित हुकूमचंद बागमार (वय 61, रा. कारंजा.नाशिक), मनोज अली (रा. भिवंडी नाशिकफाटा.पिंजारवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील जॉन आणि अजित या दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रमोद गर्जे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजित आणि मनोज या दोघांनी आरोपी जॉन याला कुरियरने व्हेल माशाची उलटी पाठवली. जॉन पिंपरी चिंचवड शहरात ही उलटी बेकायदेशीरपणे विकणार होता. याबाबत गुन्हे शाखा युनिट एकला याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी मोशी टोलनाका येथे सापळा लावून जॉन याला ताब्यात घेतले. आरोपींकडून पोलिसांनी तब्बल एक कोटी 10 लाख रुपये किमतीची व्हेल माशाची 550 ग्रॅम उलटी जप्त केली आहे. याप्रकरणी तिघांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 2 (16) (सी) 9,39,44,
48 (अ), 49 (ब), 57,51 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील तपास करीत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.