दारू पिण्यास पैसे न दिल्याने तरुणावर कटरने वार

पुणे : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणावर  कटरने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे.ही घटना पुणे रेल्वे स्टेशनसमोरील स्टेशन चौकात बुधवारी रात्री पावणेआठ वाजता घडली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

अनिल भगवान अस्मर (वय ३४, रा. पाटे खैरमळा, नारायणगाव, सध्या फिरस्ता) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून पोलिसांनी शाम नागोराव बनसोडे (वय ३२, रा. खडकपुरा गल्ली, गंगाखेड, परभणी) याला अटक केली आहे.याप्रकरणी पोलीस नाईक सूर्यकांत माने यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल अस्मर हे स्टेशन चौकात थांबले असताना शाम बनसोडे याने त्याच्याकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यात शाम याने अनिल याच्यावर धारदार कटरने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.