देशातील रेशन कार्ड धारकांसाठी केंद्र सरकारचे माझे रेशन मोबाइल App लाँच, एका क्लिकवर मिळणार सर्व माहिती

नवी दिल्ली : वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेप्रमाणेच आता मोदी सरकारकडून Mera Ration नावाचे Mobile Appसुरू करण्यात आले आहे. ज्यात गरजू म्हणजेच गरीब कुटुंबाच्या लोकांना Fair Price Shop सोबत रेशन कार्ड मध्ये आपली सध्याच्या स्थिती आणि रेशन कार्डमधील सर्व माहिती मिळू शकणार आहे. Mera Ration mobile app ला Androd Smartphones साठी लाँच करण्यात आले आहे. त्यामुळे युजर्स याला गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकतात. सध्या भारतात कुटुंबातील एका सदस्याकडे तरी स्मार्टफोन असतो. त्यामुळे मोबाइलवर सरकारी स्कीम आणि मिळणारा लाभ याची पूर्ण माहिती मिळू शकते.

One Nation-One Ration Card च्या पावलावल पाऊल टाकत आता Mera Ration मोबाइल अॅप लाँच करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्हाला रेशनसंदर्भातील सर्व कामे आता ऑनलाईन करता येणार आहेत. रेशन कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळते. मात्र ज्यावेळी एखाद्या कुटुंबाचे दुसऱ्या राज्यात स्थलांतर होते. अशावेळी त्याला स्वस्त धान्य मिळण्यास अडचणी येतात. नेमक्या याच अडचणी आता या अ‍ॅपच्या माध्यमातून दूर होणार असल्याची माहिती केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आली आहे.

माझे रेशन अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही नव्या रेशन कार्डसाठी नोंदणी करू शकता, नवे रेशन कार्ड डाऊनलोड करू शकता. तुमच्या रेशन कार्डला आधार कार्ड लिंक आहे की नाही ते देखील पाहू शकता. आधार जर लिंक नसेल तर तुम्ही स्व:ता तुमचे आधार अ‍ॅपचा वापर करून रेशन कार्डला जोडू शकता. यासोबतच आतापर्यंत तुम्हाला किती धान्य वितरीत करण्य़ात आले आहे, तुमच्या जवळ कुठे-कुठे स्वस्त धान्य दुकान आहे? याची माहिती देखील तुम्हाला मिळू शकते. जर तुम्हाला तुमचा स्वस्त धान्य दुकानदार बदलायचा असेल तर तो देखील तुम्ही या अ‍ॅपच्या मदतीने बदलू शकता.

माझे रेशन अ‍ॅप हे नागरिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोनही वाचणार आहे. रेशन कार्ड काढायचे झाल्यास किंवा त्याची नोंदणी करायची झाल्यास मोठ्याप्रमाणात कागदपत्रे सादर करावे लागत होते. तसेच त्यासाठी तालुक्याच्या गावी जावे लागत होते. मात्र आता तुम्ही घरबसल्या अवघ्या काही मिनिटांमध्ये कमीत कमी कागदपत्रांमध्ये नोंदणी करू शकणार आहात. तसेच रेशन कार्ड तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी बराच कालावधी लागत होता. मात्र आता या अ‍ॅपमधूनच ते डाऊनलोड होणार असल्याने वेळेत देखील मोठी बचत होणार आहे. सोबतच तुम्ही जर इतर राज्यात स्थलांतर केले तर, या अ‍ॅपवर स्थलांतरणाचा देखील पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.  त्यावर जाऊन तुम्ही राज्याची आणि शहराची नोंदणी केली की तुम्हाला राशन मिळू शकते.

असे करा डाउनलोड

Mera Ration mobile appचा वापर सोपा आहे. सर्वात आधी हे अॅप डाउनलोड करा. गुगल प्ले स्टोरवर तुम्हाला Central AEPDS Team) द्वारा डिवेलप केलेले अॅप मिळेल. डाउनलोड झाल्यानंतर आपला मोबाइल नंबर यात रजिस्टर करा. रजिस्टर झाल्यानंतर तुमचे रेशन कार्ड नंबर मागितले जाईल. नंबर टाकल्यानंतर सबमिट करा. मग रेशन कार्ड संबंधी सर्व माहिती मिळू शकेल. या अॅपवर गेल्या सहा महिन्यातील ट्रान्झॅक्शन आणि आधार सीडिंगची पूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या मोबाइलवर मिळू शकेल.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.