मानलेल्या बहिणीच्या मांडीस हात लावल्याच्या रागातून पाण्यात बुडवून तरुणाचा खून
पिंपरी चिंचवड : मानलेल्या बहिणीच्या मांडीस हात लावल्याच्या रागातून दोघांनी मिळून २२ वर्षीय तरुणाला पाण्यात बुडवून त्याचा खून केला. ही घटना १४ मे ते १५ मे या दरम्यान आर्मी परिसरा जवळ पिंपळे सौदागर येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
राहुल नंदु भालेराव (वय २२) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून ओंकार मिलींद गायकवाड (वय १९, रा.सुदर्शनगर लेन नं.६, पिंपळे गुरव पुणे) व केदार घनश्याम सुर्यवंशी (वय २२ रा.सिंहगड कॉलनी, पिंपळे गुरव पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. याप्रकरणी मृत मुलाच्या आईने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत राहुल भालेराव याला आरोपी ओंकार व आरोपी केदार यांनी त्यांची मानलेली बहिण हीच्या मांडीस हात लावला याचा राग येवून त्याला पवना नदीपात्र आर्मी परिसरा जवळ पिंपळे सौदागर या ठिकाणी लोखंडी हातोडी व कमरेच्या पट्याने मारहाण करून धाक दाखवून पाण्यात जबरदस्ती बुडवून जीवे ठार मारले आहे.पोलिस अधिक तपास करत आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!