ज्येष्ठ नागरिकाची पैशांची बॅग पळवणाऱ्या टोळीतील चौघांना 6 तासांत अटक
पुणे : बाजीराव रोडवरील चितळे चौकातून पायी जाणार्या एका ज्येष्ठ नागरिकाची 50 हजारांची रोकड असलेली बॅग हिसका मारून फरार झालेल्या टोळीला विश्रामबाग पोलिसांनी सहा तासांत अटक केली. त्यांनी यापूर्वी विश्रामबाग हद्दीत अशा प्रकारे आणखी एका गुन्हा केला आहे.
अली अजगर इकबाल नजे (38, रा. कल्याण), यसीन इमाम शेख (24, रा. अंबरनाथ, जि. ठाणे), राज ऊर्फ राजेश सिंग (35, रा. मुंबई) आणि रवींद्र पांचाळ (50, रा. कल्याण) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.याप्रकरणी प्रकाश उपळकर (वय ५९, रा. शुक्रवार पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
उपळकर हे शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास चितळे चौक येथील शालगर दुकानाचे समोरील सार्वजनिक रस्त्यावरुन पायी घरी जात होते. त्यांच्याकडील कापडी पिशवीत ५० हजार रुपये होते. चोरट्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली होती. ते पायी जात असताना आरोपी मोटारसायकलवरुन पाठीमागून आले. त्यांच्या हातातील पैसे असलेली कापडी पिशवी जबरदस्तीने हिसकावून घेतली व ते पळून गेले. या घटनेची माहिती मिळाल्यावर विश्रामबाग पोलिसांनी तातडीने परिसरातील CCTV फुटेज तपासले. त्यात हि घटना कैद झाली होती. त्यावरुन आरोपींचा शोध घेऊन चौघांना अटक केली आहे. आणखी दोघांबाबत चौकशी केली. त्यावेळी ते मुंबईला पळून गेल्याचे सांगण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक निंबाळकर अधिक तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!