‘पोकर’ जुगार अड्ड्यावर पोलिसाचा छापा; 58 लाखाचा मुद्देमाल जप्त

पुणे : एका इव्हेंट मॅनेजमेंटच्या व्यक्तीने भाड्याच्या बंगल्यात पोकर जुगाराचा खेळ मांडला होता. तेथे विदेशी मद्यासह सर्व सुविधा पुरविण्यात येत होत्या. या बंगल्यावर छापा टाकत पोलिसांनी विदेशी दारूच्या बाटल्या, पोकर जुगाराची साधने, 46 लाख 76 हजार 500 रूपये आणि ऑस्ट्रेलियन 5500 डॉलर तसेच 6700 युएस डॉलर असा एकुण 58 लाख 30 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.जितेन जगदिप सिंग (41 रा. सैनिक नगर, क्‍लाऊड नाईन सोसाययटी बंगला नंबर 16, कोंढवा) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, जितेन जगदिप सिंग हा पोकर जुगार खेळत व घेत असून त्या ठिकाणी जुगार खेळण्यास येणारे लोकांना तो विदेशी दारु पुरवित असल्याची खबर प्राप्त झाली होती. सामाजिक सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण  आणि अंमली पदार्थ विरोधी पथक – 1 चे निरीक्षक विनायक गायकवाड यांनी प्राप्त माहितीची खातरजमा केली.यानंतर पथकासह बंगल्यावर छापा टाकण्यात आला. तेथे सिंग ताब्यात अवैधरित्या 1,07,150 रुपये किंमतीच्या विदेशी दारुच्या बाटल्या, 1,42,500 रुपये किमतीची पोकर जुगाराची साधने त्यात काऊंटर चिपचे बॉक्‍स, पोकर टेबल, पत्त्याचे कॅटचे बॉक्‍स व वेगवेगळे आकडे असलेले रुले तसेच रोख रक्कम 47,76,500 रुपये,परदेशी चलन ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन 5,500 डॉलर व युएस 6,500 डॉलर ज्याची भारतीय चलनामध्ये किंमत 8,04,407 रुपये इतकी होती. त्याच्याकडे असा एकूण 58,30,255 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. मुद्देमाल जप्त करून त्यांचे विरुध्द महाराष्ट्र प्रोव्हिबिशन ऍक्‍ट अन्वये कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, उप आयुक्तनिवास घाडगे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण, पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, उपनिरीक्षक श्रीधर खडके, उपनिरीक्षक रेश्‍मा साळुखे, विशाल शिंदे , सचिन तरडे, महिला पोलीस अंमलदार मोहिते, पुकाळे, पोलीस अंमलदार मोहिते, चव्हाण, पठाण, कोळगे व अंमलदार जाधव, पवार, उत्तेकर, साळुके, पारधी, शेख, मोहिते यांनी केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.