CAने कर्ज मंजूर करण्यासाठी बोलावलं अन् केला बलात्कार ; सांगलीतील धक्कादायक प्रकार

सांगली :राज्यात महिलांवरील अत्याचाऱ्याच्या घटनेत मोठी वाद झालेली दिसून येत आहे. याच मुद्द्यावरून राज्य सरकारवर संपूर्ण विरोधात तुटणं पडले आहे. आज जिल्यातील अनेक शहरांमध्ये महिलांवर अत्याचाऱ्याच्या घटना अधिक प्रमाणात वाढलेल्या दिसून येत आहे. त्यातच आता कोल्हापुरातून एक धक्कादायक माहिती पुढे येत आहे. कर्ज प्रकरणाचं काम पूर्ण करून देतो, म्हणत एका सीएने महिलेशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पीडित महिलेच्या निराधारपणाचा फायदा घेत आरोपी CA ने तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला. आरोपीने 6 वर्ष पीडितेचं लैंगिक शोषण केलं आहे. चंद्रकांत चौगुले असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. याप्रकरणी संबधित महिलेनं पोलिस ठाण्यात फिर्याद  दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी चंद्रकांत चौगुले हा सांगलीतील विश्रामबाग परिसरातील सिल्व्हर ओक अपार्टमेंटमधील रहिवासी आहे. तर पीडित महिला ही घटस्फोटित असून ती आपल्या दोन मुलांसह आईसोबत कोल्हापूर येथे राहते. पती सांभाळत नसल्याने पीडित महिलेने 2012 साली घटस्फोट घेतला होता. पतीपासून वेगळं झाल्यानंतर, त्यांना इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी त्यांना काही पैशांची गरज होती.

या कारणाने पीडित महिलेच्या एका परिचिताने सांगलीतील सीए चंद्रकांत चौगुले यांच्याबद्दल सांगितले. त्यानंतर पीडितेनं चौगुलेशी संपर्क साधला असता, त्याने कागदपत्रे घेऊन पीडितेला सांगलीला बोलावलं. यानंतर आरोपी विविध कारणं देऊन पीडितेला सतत सांगलीला बोलावू लागला. दरम्यान एकेदिवशी आरोपी चौगुले याने पीडितेला घरी बोलावलं. यावेळी घरी कोणीचं नव्हतं. संधी साधत आरोपीनं पीडितेवर प्रेम असल्याचं सांगत लग्नासाठी मागणी घातली. परंतु, पीडितेनं नकार दिला. यानंतर आरोपीनं पीडितेवर जबरदस्ती करत अत्याचार केला.

या घटनेनंतर आरोपीनं 2012 ते 2018 या कालावधीत पीडितेला बदनाम करण्याची धमकी देत अनेकदा अत्याचार केला आहे. पीडित महिलेनं 2018 साली आरोपीसोबत संबंध तोडल्यानंतर देखील त्याचा त्रास सुरूच राहिला. संबंध तोडल्यानंतर आरोपीनं लैंगिक संबंधाची माहिती पीडितेच्या पतीला देखील दिली आहे. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेनं विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी पीडित महिलेनं विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.