पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई ! MHADA चा पेपर फोडण्याचा प्रयत्न, तिघांना पुण्यातून अटक
पुणे :आरोग्य विभागाचा पेपर फोडणार्यांवर कारवाई केल्यानंतर आता पुणे सायबर पोलिसांनी म्हाडा भरती परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुण्यात तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये दोन एजंट आरोपी बुलढाण्याचे तर एक जण परीक्षा घेणारा संस्थेतील पुण्यातील आरोपी आहे. त्यामुळे परिक्षा रद्द करण्यात येत असल्याचे गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी Twitter वर रात्री उशिरा जाहीर केले आहे
संतोष हरकळ, अंकुश हरकळ (दोघे रा.बुलढाणा), प्रितेश देशमुख (पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हाडाची पूर्व परिक्षा आज होणार होती. तसेच वेगवेगळ्या पदासाठी या आठवडा भर परिक्षा घेण्यात येणार होती. या सर्व परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या परिक्षा जानेवारीत घेण्यात येणार आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे म्हाडाच्या व इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा जानेवारीमध्ये होणार आहेत. आज परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांची जी गैरसोय होणार आहे, त्याबद्दल मी क्षमा मागतो. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी. कोणत्याही विद्यार्थ्याने परीक्षा देण्यासाठी सेंटरवर जाऊ नये, गाव सोडू नये असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
म्हाडा च्या पूर्ण आठवड्यात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे
उद्या परीक्षा होणार नाही pic.twitter.com/ewR8XrWe0G— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 11, 2021
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!