शिव फाउंडेशन भिगवण च्या वतीने ऊस तोड मजुरांना 100 ब्लॅंकेट वाटप
भिगवण (नारायण मोरे) :शिव फाउंडेशन भिगवनच्या वतीने ऊसतोड कामगारांना शंभर ब्लँकेट वाटप करण्यात आले. शिव फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संपत बंडगर यांनी शिव फाउंडेशन च्या स्थापने दिवशी समाजहीत उपयोगी जोपासून फाउंडेशनची कार्याची वाटचाल सुरू केली व भविष्यात अशाच गोर गरीब लोकांकरिता काम करणार असल्याचे सांगितले.
ऊस तोडणी हंगाम सुरू झाल्यावर शेकडो किलोमीटरवरून आपले घरदार सोडून ऊस तोडणी कामगार आपल्या कुटुंबासह साखर कारखाना परिसरात ऊसतोडणी साठी आलेले असतात व शेतात उघड्यावर पाल ठोकून राहतात आशाच मदनवाडी परिसरातील कामगारांच्या कुटुंबांना या कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण व्हावे आणि त्यांना मायेची ऊब देण्याचा प्रयत्न म्हणून हा उपक्रम आयोजित करण्यात आला. स्तुत्य असा उपक्रम राबविल्याबद्दल आयोजकांचे कौतुक ग्रामस्थांनी करण्यात आले.
यावेळी उपस्थित शिव फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष संपत बंडगर, रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत, पुणे जिल्हा सरचिटणीस सतीश शिंगाडे , पत्रकार प्रा. प्रशांत चौरे ,पत्रकार निलेश गायकवाड , माजी उपसरपंच रणजित निकम, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ गुरगुळे, उपाध्यक्ष पुणे जिल्हा दिनेश मारणे,माऊली मारकड, प्रवीण सलगर ,डॉ.अमोल खानावरे, प्रा.शाम सातरले ,अकबर तांबोळी,संजय चौधरी,नामदेव कुदळे,अक्षय बंडगर, प्रवीण थोरात ,महेश कदम ,प्रवीण बंडगर उपस्थित होते.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!