कदमवाकवस्ती : राष्ट्रीय पातळीवर कराटे स्पर्धेत यश मिळविलेल्या स्पर्धकांचा सत्कार
लोणी काळभोर (दिगंबर जोगदंड) : राष्ट्रीय पातळीवर कराटे स्पर्धेत यश मिळविलेल्या स्पर्धकांचा सत्कार समारंभ रविवारी पार पडला.यावेळी कराटे कलर बेल्ट परीक्षेत यश मिळवलेल्या स्पर्धकांचेही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक गणेश ढोरे, प्राध्यापक सतीश कुमदाळे,युवा नेते गणेश बोराटे, स्वीकृत नगरसेवक अविनाश काळे, युवा नेते अभिजीत बोराटे, चेअरमन शैलेश चंद, क्रीडाशिक्षक नवनाथ वाघमारे, युवा उद्योजक अजय शिंदे तसेच कराटे प्रशिक्षक प्रदीप वाघोले, राम सोनुणे, तेजस वाघोले, आणि सर्व पालक वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते. हा सत्कार समारंभ शिवशंकर मंगल कार्यालय भेकराईनगर येथे पार पडला. यामध्ये ९० विध्यार्थी कराटे कलर बेल्ट परीक्षा मध्ये सहभागी झाले होते. त्यातील ११ विद्यार्थ्यांना बेस्ट- स्टुडन्ट या सन्मान चिन्हाने गौरवण्यात आले. त्यामध्ये ओजस्विनी पुरानिक, यथार्थ बस्मे, आराध्या बोरावने, खुशी माहेश्वरी,शुभम कंटाळे, लक्ष्म पुजारी, आर्या कुंभार, दिव्या चव्हाण,संस्कृती चांगण, किरण नांगरे, स्वराली जगताप हे खेळाडू सन्मानाचे मानकरी ठरले. मान्यवरांनी बोलताना सर्वच विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन चॅम्पियन स्पोर्ट्स कराटे-डू असोसिएशन इंडिया या संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष हेमंत डोईफोडे यांनी केले. संस्थेमधून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीचे खेळाडू तयार होतील असा शब्द सर्व मान्यवर व पालकांसमोर दिला.मान्यवरांचे व सर्व पालकांचे आभार मानले कार्यक्रम उत्साहात पार पडला.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!