तुझ्याबरोबर लग्न करतो, तुझ्या मुलाना वडिलांप्रमाणे सांभाळतो असे आश्वासन देऊन महीलेवर बलात्कार ,हडपसर परिसरातील घटना
पुणे : तुझ्याबरोबर लग्न करतो, तुझ्या मुलाला वडिलांप्रमाणे सांभाळतो, असे आश्वासन देऊन महिलेसोबत वारंवार शरीर संबंध ठेवले. नंतर लग्नास नकार देऊन महिलेस मारहाण केली. याप्रकरणी 37 वर्षीय व्यक्तीच्या विरोधात हडपसर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.हा प्रकार 2018 पासून 10 ऑक्टोबर 2021 दरम्यान घडला आहे.
विरभद्र सुधाकर खरोसे (वय 37, रा. नांदेड फाटा, सिंहगड रोड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी फुरसुंगी येथील एका 29 वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,फिर्यादी या आपल्या मुलासमवेत फुरसुंगी येथे रहातात. विरभद्र खरोसे याने फिर्यादी यांना लग्नाचे आश्वास दिले. तुझ्या मुलाला वडिलांप्रमाणे सांभाळतो, असे सांगून विश्वास संपादन केला. वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्यांच्याबरोबर शारिरीक संबंध प्रस्थापित केले. फिर्यादी यांनी लग्नाबाबत वारंवार विचारणा केली. तेव्हा त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. हडपसर पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक खळदे तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!