पुण्याच्या वारजे माळवाडीत गाडीचा धक्का लागल्याने झालेल्या वादात सराईत गुन्हेगाराने तरुणावर केला कोयत्याने वार,
पुणे : गाडीचा धक्का लागल्याने झालेल्या वादात सराईत गुन्हेगाराने साथीदारांसह तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वारजे येथील रामनगरमधील शिवाजी चौकात रविवारी दुपारी साडेचार वाजता घडला.
सराईत गुन्हेगार गणेश ऊर्फ गुड्ड्या पटेकर , त्याचा मित्र चिक्या जगताप व त्याच्या इतर दोन साथीदारांविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी सोनु रमेश शिंदे (वय २३, रा. रामनगर, वारजे) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश पटेकर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. सोनु शिंदे हा रविवारी सकाळी जात असताना त्यांच्या गाडीचा धक्का चिक्या जगताप याला लागला. त्यावरुन त्यांच्यात वादावादी झाली होती. शिंदे हा दुपारी साडेचार वाजता शिवाजी चौकातून जात असताना गणेश पटेकर याने त्याला अडविले. सकाळी काय म्हणत होतास असे म्हणून शिवीगाळ करुन त्याच्याजवळील शर्टात पाठीमागे दडविलेला कोयता काढून फिर्यादीचे डोक्यात मारला. त्याने तो चुकविला. तेव्हा इतर आरोपीने लाकडी बांबुने फिर्यादीच्या पाठीवर मारले. फिर्यादी वार चुकविण्यासाठी पळून जाऊ लागले. तेव्हा त्याच्याबरोबर यश चव्हाण हाही पळून जाऊ लागला. गणेश पटेकर याने त्याच्या हातातील कोयत्याने चव्हाण यांच्या डोक्यात कोयता मारुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या मदतीला येणार्या लोकांचे अंगावर धावून जाऊन परिसरात दहशत निर्माण केली. पोलीस उपनिरीक्षक पडवळ (PSI Padwal) तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!