पुण्यातील पहिली ते सातवीच्या शाळा १६ डिसेंबरपासून सुरू होणार
पुणे –: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तब्बल पावणे दोन वर्ष बंद असलेल्या पुणे महापालिका हद्दीतील पहिली ते सातवीचे वर्ग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकांनी याची नोंद घ्याव. असे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.
शाळा सुरु करण्यासंदर्भात पुण्याचे पालकमंत्री अजित पवार , महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या बैठक झाली. या बैठकीत पुण्यातील शाळा 16 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
या संदर्भात माहिती देताना महापौर मुरलीधर मोहळ म्हणाले, “पुणे शहरातील सर्व शाळा या १६ डिसेंबरपासून आपण सुरू करत आहोत. पहिली ते सातवी इयत्तेचे वर्ग हे १६ डिसेंबर रोजी सुरू होत आहेत. देण्यात आलेल्या काही गाईडलाईन्स, मार्गदर्शक सुचने प्रमाणे शाळा सुरु करण्यात येणार आहेत. शाळा सुरु करत असताना शाळांचे निर्जंतुकीकरण करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणं याबाबतच्या संबंधितांना सूचना दिल्या असून 16 डिसेंबर पासून पुण्यातील 1 ली ते 7 वीचे वर्ग सुरु करण्यात येणार आहेत.
पुण्यातील १ ली ते ७ वीचे वर्ग गुरुवारपासून !
पुणे मनपा हद्दीतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग येत्या गुरुवारपासून (१६ डिसेंबर, २०२१) सुरु करण्याचा निर्णय आपण घेतला असून याची पालकांनी नोंद घ्यावी. pic.twitter.com/Kvse0mrGeL
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) December 14, 2021
तसेच, “यामुळे पुण्यातील शाळा कधी सुरू होणार? हा मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला विषय आता मार्गी लागलेला आहे. गुरूवारपासून महापालिकेच्या हद्दीतील सर्व शाळा सुरू होत आहेत.” असं महापौर मोहळ यांनी सांगितलं.
राज्य शासनाकडून करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर टप्प्या टप्प्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार 4 ऑक्टोबरपासून शहरी भागातील आठवी ते बारावी व ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीच्या शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. त्यानंतर 1 डिसेंबरपासून शहरी भागातील इयत्ता पहिली ते सातवी व ग्रामीण भागातील पहिली ते चौथीच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला होता. त्याबाबत मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या होत्या.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!