बेकायदेशीररीत्या पिस्तूल बाळगणाऱ्या सराईताला अटक, वाकडं पोलिसाची कामगिरी
पिंपरी चिंचवड : बेकायदेशीररीत्या पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास वाकडं पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आली. समीर रफीक अन्सारी (वय २६ रा. उमेश टेकाळे यांचे घराचे मागे,
गणेश मंदिर जवळ, बोरडे नगर, थेरगाव, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वाहनचोरी, घरफोडी, शरीराविरुध्द गुन्हे करणारे, सराईत गुन्हेगार यांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्ह्यांना प्रतिबंध करणेबाबत सुचना दिल्या त्या अनुषंगाने पोलिस हद्दीत पेट्रोलींग करत असताना त्यांना माहिती मिळाली कि,हॉटेल अतिथी समोर, बारणे कॉर्नर, प्रसुधान सोसायटी रोड, थेरगाव पुणे येथे एक व्यक्ती थांबलेला असून त्याच्याकडे पिस्टलसारखे हत्यार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडुन एक लोखंडी गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले.
अटक करण्यात आलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध हिंजवडी व वाकडं पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!