लग्नाचे आमिष दाखवून भूगाव येथील लॉजवर नेऊन बलात्कार ; नंतर मारहाण करुन जबरदस्तीने गर्भपात

पुणे :  लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन असताना तिच्या इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध ठेवून त्यातून तिला गर्भवती केले. त्यानंतर तिला मारहाण करुन जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २५ जून २०१७ पासून ऑगस्ट २०२१ दरम्यान घडला.

सुदिप ऊर्फ राज बराई (वय २६, रा. पाचपांडव सोसायटी, गोखलेनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका २१ वर्षाच्या तरुणीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी या अल्पवयीन असताना आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून भूगाव येथील लॉजवर नेले. तेथे तिच्याशी जबरदस्तीने शारिरीक संबंध केले. त्यातून फिर्यादी या गर्भवती राहिल्या. आरोपीला याची माहिती मिळाल्यावर त्याने तिला शिवीगाळ करुन मारहाण केली. तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले.

त्यानंतर तिने वेळोवेळी लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने नकार दिला. त्यामुळे तिने पोलिसांकडे तक्रार दिली असून चतु:श्रृंगी पोलिसांनी बलात्कारासह पोक्सो अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.