पिंपरी चिंचवडमधील काटेपुरम चौकात तरुणावर अंधाधुंद गोळीबार ! उपचारा दरम्यान तरुणाचा मृत्यू ; प्रचंड खळबळ

पिंपरी चिंचवड : पिंपळे गुरव मधील काटेपुरम येथे तरुणावर दुचाकीवरुन आलेल्यांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबार करण्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.ही घटना शनिवारी (ता. १८) सकाळी दहाच्या सुमारास सुमारास घडली. तरुण रस्त्यावर उभा असताना तेथे आलेल्या दोन ते तीन जणांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या यामध्ये तो जखमी झाला. उपचारा दरम्यान जगतापचा त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

योगेश जगताप (रा. पिंपळे गुरव, सांगवी)  असे फायरिंग हल्ल्यात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळं संपुर्ण पिंपरी-चिंचवड परिसरात प्रचंड खळबळ  उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सांगवी येथील काटे पुरम चौकात योगेश जगताप हा मेड प्लस दुकानासमोर असताना दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर 4 गोळ्या झाडल्या. गोळ्या लागल्याने योगेश तेथेच खाली कोसळला. त्यास तातडीने औंध हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु असताना उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांना घटनास्थळावर गोळीच्या पुंगळ्या मिळाल्या आहेत. हल्ल्याचे नेमके कारण अजून समजू शकले नाही.

हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपास त्यासह नागरिकांकडे चौकशी करून पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. यासाठी तातडीने पथके रवाना करण्यात आले आहे. गणेश मोटेनी फायरिंग केल्याचा संशय आहे. याचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, भरदिवसा कोट पुरम चौकात अंदाधुंद गोळीबार झाल्यानं प्रचंड खळबळ उडाली

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.