लग्नास नकार दिल्याने स्कार्पने गळा आवळून तरुणीचा खून, आरोपी अटकेत

पिंपरी चिंचवड : लग्नास नकार दिल्याने तरुणीचा गळा स्कार्पने आवळून खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना १६ डिसेंबर रोजी १०.३० वा. सुमारास ओयो हॉटेल टाउन, बेंगलोर हायवे, ताथवडे येथे घडली.याप्रकरणी वाकड पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

सपना अशोक गवारे (वय २७) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर हेमंत अशोक मोहिते (वय २९, रा. तळबीड , तालुका कराड जिल्हा सातारा) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अशोक नारायण गवारे (रा. तुकारामनगर, मु.पो. वाशी, उस्मानाबाद ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सपना यांचा लग्नास विरोध असताना आरोपीने त्यांना धमकावून सोबत राहण्यास भाग पाडले. नंतर त्यांच्याकडे लग्नासाठी तगादा लावला मात्र सपना त्यांनी लग्नाला नकार दिला . याचा राग मनात धरून गुरुवारी (ता.१६) सकाळी दहाच्या सुमारास ताथवडे येथील बेंगलोर हायवे वरील एका हॉटेलमध्ये सपना यांचा स्कार्पने गळा आवळून खून केला. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.