विवाहितेची तेरा वर्षाच्या मुलीसह आत्महत्या ; रहाटणीतील धक्कादायक प्रकार
पिंपरी :पतीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून विवाहितेने आपल्या तेरा वर्षाच्या मुलीसह राहत्या घरात ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सज्जनगड कॉलनी, रहाटणी येथे शनिवारी (दि. १८) सकाळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे तर त्याच्या प्रेयसीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनीता युवराज नवले (वय ३६), श्रावणी युवराज नवले (वय १३, रा. सज्जनगड कॉलनी, रहाटणी), असे आत्महत्या केलेल्या मायलेकींचे नाव आहे. तर पती युवराज राजाराम नवले (वय ४०) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या प्रेयसीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीता या पती युवराज व मुलगी श्रावणी व दहा वर्षाचा मुलगा स्वराज यांच्यासमवेत राहत होत्या. पती युवराज हा गाडी भाड्याने देण्याचा व्यवसाय करतो. युवराजचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. या कारणावरून पती-पत्नीत सतत वाद होत असत. युवराज हा पत्नी सुनीताला त्रास देत असे. तिला मारहाणही करायचा. या त्रासाला सुनीता वैतागल्या होत्या.दरम्यान, शुक्रवारी (ता.१७) युवराज गाडीचे भाडे घेऊन बाहेर गेला होता. मध्यरात्री दोन वाजता घरी आल्यावर मुलगी श्रावणीने दरवाजा उघडून त्यांना प्यायला पाणी दिले. त्यानंतर युवराज टेरेसवर झोपायला गेला.मयत सुनीता यांचे पती युवराज नवले हे रात्री दोनच्या सुमारास घरी आले. त्यावेळी घरातील सर्वजण गप्पा मारत होते. त्यानंतर युवराज नवले हे टेरेसवर झोपण्यासाठी गेले.
दरम्यान, युवराज यांची पत्नी सुनीता आणि मुलगी श्रवणी यांनी बेडरूममध्ये जाऊन ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी युवराज यांचा मुलगा स्वराज हा सकाळी लघुशंकेसाठी करता उठला. त्याने आईला आवाज देत बेडरूमचा दरवाजा वाजवला.मात्र, आतून काहीच प्रतिसाद न आल्याने त्याने टेरेसवर झोपलेल्या वडिलांना बोलावून आणले. त्यानंतर त्यांनी बेडचा दरवाजा तोडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.सुनीताने आत्महत्येपूर्वी मोबाईलवर व्हीडीओ तयार केला आहे. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!