स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसाया चारॅकेटचा पर्दाफाश, 5 महिलांची सुटका
पिंपरी: स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभाग व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने कारवाई करून पाच पीडित महिलांची सुटका केली. ही कारवाई वाकड येथील ब्लॉसम सलून अँड स्पा सेंटर येथे शुक्रवारी (दि.17) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास केली.
स्पा सेंटरचा चालक-मालक सचिन सुरेश भिसे (वय ३३, रा. शिराढोण, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद), स्पा सेंटरची मॅनेजर मोहिनी फुलचंद घुगे/ मोहिनी लहू सोनवणे (वय २५, रा. रहाटणी), अभय मारुतीराव छिद्री (वय ४०, रा. रहाटणी, काळेवाडी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलीस कर्मचारी सोनाली माने यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,बालेवाडी-हिंजवडी रोड,भुजबळ चौक, वाकड, पुणे येथे The address commericia या मॉलमध्ये चौथ्या मजल्यावर Blossom saloon and spa सेंटरमध्ये स्पा सेंटरचा चालक-मालक आरोपी सचिन भिसे आणि मोहिनी हे दोघे संगनमताने स्पा सेंटरच्या नावाखाली महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवुन घेतात. अशी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन सामाजिक सुरक्षा पथक व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी वाकड पोलीस स्टेशन हद्दीत स्पा सेंटरमध्ये डिकॉय कस्टमर पाठवुन वेश्या व्यवसाय चालतो अशी खात्री होताच सापळा रचुन १५:२० वा चे सुमारास छापा टाकला.
असता असा प्रकार उघडकीस आला की, वेश्यागमनासाठी स्पा सेंटर चालक-मालक व महिला मॅनेजर हे प्रतिग्राहक ३ हजार रुपये घेतात व त्यातुन महिलांना वेश्यागमनाचा मोबदला म्हणुन प्रत्येकी ५०० रुपये देऊन स्पा च्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवितात. या कारवाईत पोलिसांनी १ परदेशी,१ कर्नाटक या पर राज्यातील व ३ राज्यातील अशा एकुण ०५ पिडीत महिलांची वेश्याव्यवसायातुन सुटका केली
आरोपी अभय छिद्री याने त्याच्या नावावर असलेली जागा कोणतेही ॲग्रीमेंट न करता आरोपी सचिन आणि मोहिनी यांना उपलब्ध करून दिली. त्यांनी या जागेवर स्पा सेंटर च्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू केला. वेश्या व्यवसाय साठी जागा उपलब्ध करून दिल्यामुळे जागा मालक अभय छिद्री याच्या विरोधात देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!