कोयत्याचा धाक दाखवत बिअर शॉपीमधील ३५ हजार लुटले ; पिंपरी चिंचवडमधील घटना

पिंपरी चिंचवड :कोयत्याचा धाक दाखवत देशी दारू बार व बियर शॉपी चालवणा-यास बेदम मारहाण करून दुकानातून 35 हजारांची रोकड जबरदस्तीने चोरून नेली. धक्कादायक म्हणजे, हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.ही घटना शनिवारी (दि. 18) सायंकाळी साडेपाच वाजता जुनी संगी येथे घडली.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

याप्रकरणी बबन रामराव खराटे (वय 26, रा. जुनी सांगवी) यांनी  सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खराटे हे जुनी सांगवी येथील एम यु शितोळे नावाचे देशी दारू बार व बियर शॉपी चालवतात. शनिवारी सायंकाळी ते त्यांच्या दुकानावर असताना आरोपी दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या दुकानात आले. एकाने फिर्यादी यांना कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ करून मारहाण केली. दुस-याने दुकानाच्या काउंटरमधून दिवसभर जमा झालेली सुमारे 35 हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर आरोपी पायी पळून गेले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

दरम्यान, सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वीच तडीपार गुंडाने भर चौकात गोळ्या झाडून सराईताचा खून केल्याची घटना घडली होती. त्यात, कोयत्याचा धाक दाखवून दमदाटी करत पैसे घेऊन अज्ञातांनी पोबारा केल्याची घटना आज उजेडात आली आहे. त्यामुळं शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे वारंवार पुढे येत आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.