पिस्टल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक ;पिस्टल, पाच काडतुसे जप्त

पिंपरी चिंचवड :बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी वाकडं पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. ही कारवाई रविवारी (दि. 19) मध्यरात्री पावणे एक वाजताच्या सुमारास रहाटणी मधील कोकणे चौकातील चौपाटीवरून करण्यात आली

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

अजित रामलखन यादव (वय 25, रा. काळेवाडी. मूळ रा. मध्य प्रदेश), हिमाचल अतरसिंग रावत (वय 24, रा. काळेवाडी, मूळ रा. मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई विनायक घारगे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी येथील गस्तीवरील पोलिसांना माहिती मिळाली की, रहाटणी मधील कोकणे चौकातील चौपाटीवर दोघेजण थांबले असून त्यांच्याकडे पिस्टल आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली. पोलिसांनी अजित आणि हिमाचल या दोघांना ताब्यात घेतले. अजित यादव यांच्याकडून 30 हजार रुपये किमतीची एक गावठी पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.